मित्र
कळतच नाही तुझ्यात एवढी का गुंतले,
मित्र म्हणून आवडलास म्हणूनच का रमले
कधी न संपणार्या आपल्या गप्पा गंमत,
विषयांचं काय, त्याला तर कधीच ना अंत
प्रत्यक्ष भेट नाही, तरी भेटलो मनातल्या मनांत,
विचार तुझा येतां, हसू गालातल्या गालात
समजून घेतो एकमेकांना, न काही सांगता,
या नात्याची खोली, शब्दात काय मांडता
आपलं मित्रत्वानं जुडणं हा नसे योगायोग,
मला तर वाटतं हा ईश्वरी संयोग
प्रत्येकाच्या नात्यांत असते निराळेपण,
मैत्रीतली पवित्रता आणि विचारांमधली शुद्धता
हेच तर आपलं वेगळेपण ।
अरुंधती
No comments:
Post a Comment