Tuesday, 10 May 2022

स्पर्श

अनंत सूर्यमालाअथांग सागरअमाप वारा,

कसा रे सांभाळिशी विश्वाचा पसारा 


देणे आणि देणे हेच तर तुला ठाऊक,

घेता-घेता आणि घेऊन आम्ही होतो का रे भावुक।


तुझेच घेऊन मिरवतो अहंकार,

कधी का नाही मानले तुझे आभार 


इतके घेऊन सुद्धा अंतरी नाही समाधान,

‘देण्याच्या’ विचाराला मनांत का नाही स्थान 


वय वाढत चालले पण सापडेना आयुष्या योग्य दिशा 

तूच न्यावे पैल तीरा हीच आता मनी आशा 


तुझ्या स्पर्शाने जीवना अर्थ यावा,

मी तू पण जाऊनीतुझ्यातच जीव रमावा 


अरुंधती

Friday, 6 May 2022

मित्र

 

मित्र


कळतच नाही तुझ्यात एवढी का गुंतले,

मित्र म्हणून आवडलास म्हणूनच का रमले


कधी  संपणार्या आपल्या गप्पा गंमत,

विषयांचं कायत्याला तर कधीच ना अंत


प्रत्यक्ष भेट नाहीतरी भेटलो मनातल्या मनांत,

विचार तुझा येतांहसू गालातल्या गालात


समजून घेतो एकमेकांना काही सांगता,

या नात्याची खोलीशब्दात काय  मांडता


आपलं मित्रत्वानं जुडणं हा नसे योगायोग,

मला तर वाटतं हा ईश्वरी संयोग


प्रत्येकाच्या नात्यांत असते निराळेपण,

मैत्रीतली पवित्रता आणि विचारांमधली शुद्धता

हेच तर आपलं वेगळेपण ।


अरुंधती