तुझे नाव ओठी, तुझाच विचार चित्ती
माझ्या मनाच्या ठायी, तुझीच प्रीती ।
माझे, तुझे मन झाले एकरूप,
माझ्यात दिसते आता, तुझेच रुप ।
माझ्या मनीचे तरंग, शब्दावाचूनि समजती तुजला,
तूच माझा सखा, सोबती हे ठाव आहे मजला ।
कणाकणाने वाढतो तुझा माझा बंध,
गुलाबाहूनही मोहक आपल्या प्रीतीचा गंध ।
तुझ्या, माझ्या प्रेमाला नसे अंत ना पार,
ह्या प्रेमाच्या डोहातच गुंजतो ओमकार ।
नको दूर लोटू, नको अंतर देऊ,
तू माझा आणि मी तुझीच होऊन राहू ॥
अरुंधती