Thursday, 12 October 2023

A Tea date with the Sun

 A tea date with the Sun


वेगळं वाटतंय नानाव वाचून!! सांगतेमाझं एक गुपित

दररोज सकाळचा पहिला चहा त्याच्याबरोबर!! तोच संपूर्ण आसमंत उजळून टाकणारा तेजोनिधी… उठल्याबरोबर गॅलरीचं दार उघडून माझी वाट पाहत तिष्ठत असलेल्या त्याच्या किरणांना वाट करूनदेतेते सुद्धा अगदी हसतमजेत मला गुड मॉर्निंग करून पूर्ण घराचा जणू ताबाच घेतातत्याची ही जादूमाझं मन पण काबीज करतेआणि मी अजूनच त्याच्या प्रेमात पडते

त्याच्या दिव्यत्वापुढे आपोआपच हात जोडले जातात आणि मी नतमस्तक होते


वाफाळत्या चहाचा कप घेऊन आमची मैफिल सजतेत्याच्या किरणाकिरणांत सामावलेलं तेजकणाकणाने मी स्वतःत भरून घेतेतोही आनंदाने त्याचा सुवर्णवर्षाव करतच असतोत्याच्या तेजानेउजळलेला माझा चहा आहे की अमृत असंच वाटतं मला!!! 

त्याच्या त्या विविध छटांमधून प्रेमाचा वर्षावच करतो तो!! त्याच्याचबरोबर दिवसभराचं प्लॅनिंग करूनटाकते मीतो ही तितक्याच समजूतदारपणे हामी भरत असतो माझ्या प्रत्येकच विचाराला!! 

त्याचं चैतन्य देऊन तो माझं मन चैतन्यपूर्ण करतो आणि त्याची किरणं व्हिटॅमिन डी ची पाकिटंमुक्तहस्ताने उधळत शरीरातल्या प्रत्येक सेलला ज्वलंत ऊर्जा देत त्याच्या असण्याचंयेण्याचं जणूसार्थकच करतात.


त्याच्याबरोबरचा तो वेळक्षण संपूच नये असं वाटतंपण  थांबणं हा तर त्याचा पक्का गुणधर्म!!

मग कायकितीही मनात नसलं तरी चहा संपवून त्याला निरोप द्यावाच लागतो

पण त्याचं ते चैतन्य दिवसभर असतं माझ्याबरोबर!!! ते बरोबर पुरतं तो पुन्हा भेटेपर्यंतरात्री झोपतानाओढ असते त्याला भेटण्याची… त्यालाही असेलच की….


काय आहे हे विलक्षण नातंतो दिसला नाही तर करमत नाहीत्याच्याशिवाय आयुष्य हे आयुष्यराहणारच नाहीहे तो ही जाणतोच बहुदाम्हणूनच आहे तो… कायम माझ्याबरोबर असाच… दिव्य तेजघेऊनपूर्ण आसमंत झगमगवत आणि त्याच्या कोटी कोटी किरणांनी प्रेमाचा वर्षाव करत


                                                   अरुंधती